Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 :लाडकी बहीन योजना: वादाच्या भोवर्यात अडकलेली सरकारी योजना





Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 :लाडकी बहीन योजना: वादाच्या भोवर्यात अडकलेली सरकारी योजना

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : ग्रामीण भागात अथवा शहरी भागात असो सर्व महिला या कुटुंबाचा कणा असतात. संपुर्ण कौटुंबिक जिम्मेदारी त्या योग्यपणे पार पाडत असतात. असे असताना स्त्री पुरुष समानता हे एक मुख्य उद्दिष्ट आपल्या सरकारने डोळ्यापुढे ठेवून ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना’ ही जाहीर केली. या योजनेतून महिलांना आर्थिक सहाय्य मिळून त्या स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी छोटे छोटे उद्योग जसे की शिवणकाम, कुक्कुटपालन अ‍से अ‍नेक व्यवसाय जे त्यांच्या कुटुंबाशी अर्थिक हातभार लावणार आहेत असे व्यवसाय त्या स्वतःहून करू शकतील हे सरकारचं ध्येय असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महिलांना केंद्र ठेवून ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली.

जुन्या असलेल्या योजना तसेच नवीन योजना ह्या सर्व योजनांचा मेळ घालून महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना राज्य शासनाकडून ही महत्वकांक्षी योजना चालू केली. ह्या योजनेतून महिला तसेच मुली उद्योजकता आहार शिक्षण तसेच कौशल्य विकास अशा विविध योजनांसाठी योजनांची घोषणा करत अर्थमंत्री अजित पवार यांनी ह्या योजनेची घोषणा केली.

०१ जुलै २०२४ पासून ह्या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून राज्य सरकारकडून या योजनेसाठी किंवा योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना प्रति महिना १५००/- रुपये आर्थिक मदत बॅंकेत DBT च्या माध्यमातून खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

Mukhya Mantri Majhi Bahin Yojana

लाडकी बहीन योजना: वादाच्या भोवर्यात अडकलेली सरकारी योजना

राज्य शासनाकडून खरोखरच लाडक्या बहिणींना सुरू असलेली ही योजना आज वादाच्या भवऱ्यात अडकली आहे का याचा आपण थोडासा विचार विनिमय करण्याचा प्रयत्न करूया. ही योजना लाडकी बहीण योजना मुलींच्या व महिलांच्या सशक्तीकरणासाठी राज्य शासनाकडून चालू करण्यात आली. सामाजिक अर्थव्यवस्थेचा पाया असलेली स्त्री ही डोळ्यासमोर ठेवून या योजनेमध्ये राज्य शासनाने भरघोस असे आपले योगदान दिले. पण आज नवीन निवडणूक 2024 झाल्यानंतर खरोखरच नवीन येणारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे अशी चालू ठेवू शकतात का ? ह्याच्यावरती थोडा विचार करणे गरजेचे आहे. तसे पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना व उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्या सरकारच्या काळात चालू झालेली आहे. ह्या योजनेचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील झाला आहे. आताही त्यांचे सरकार बहुमतामध्ये असल्यामुळे हे सरकार पूर्णपणे आपली ही योजना जी त्यांनी चालू केलेली आहे तिला सक्षम हातभार लावतील अशी एक अशा जनमानसातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तूर्तास तरी लाडकी बहीण योजना वादाच्या भौऱ्यात अडकलेली दिसत दिसून येत नाही. ज्या सरकारने ही योजना आणली तेच सरकार स्थिरपणे राज्य शासनात असल्यामुळे तसा विचार सुद्धा आपल्या मनात येऊ शकत नाही.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
राज्यमहाराष्ट्र विभाग महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन
योजनेची सुरुवात28 जून 2024
योजनेचा उद्देशराज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून त्यांना आर्थिक स्वतंत्र देणे
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन/ऑफलाइन
आर्थिक मदत१५०० – रुपये प्रति महिना
लाडकी बहीण योजना ऑफिसियल वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
हेल्पलाइन नंबर 181
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

Features of Ladki Bahin Yojana Maharashtra

  • 21 ते 65 वर्षातील महिलांसाठी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल.
  • राज्य शासनाने या योजनेसाठी 46000 कोटीची तरतूद केली आहे.
  • राज्यातील महिलांना दर महिना 1500/- रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.

Eligibility of Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra

  • 21 ते 65 वयोग्य वर्षातील महिलांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच घेता येणार आहे
  • मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना चा लाभ घेण्याकरिता कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे
  • ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात त्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत तसेच सरकारी नोकरी करणारी महिला पण या योजनेचा लाभ घेऊन शकणार नाही.

Ladki Bahin Yojana Required Documents

  • फोटो आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • हमीपत्र जन्म दाखला
  • शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र
  • मतदार ओळखपत्र
  • रेशन कार्ड

Vayoshri Yojana :मुख्यमंत्री वयोश्री योजना

Ineligibility for Majhi Ladki Bahin Yojana

  • अशा महिला ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असतील किंवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असतील तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
  • कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार असेल तर अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
  • कुटुंबातील सदस्यांच्या नावे ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन असेल तर त्यामध्ये परिवारातील महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही .
  • आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Online Apply for Majhi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खालील प्रमाणे अर्ज करा

Step – 1 : Narishakti Doot – App तुमच्या मोबाईल वरती डाऊनलोड करा व इन्स्टॉल करा

लाडकी बहीन योजना: वादाच्या भोवर्यात अडकलेली सरकारी योजना,
Narishakti Doot

Step – 2 :पूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा, तालुका, नारीशक्ती प्रकार या महत्त्वाची माहिती भरा व अपडेट करा.

Step – 3: ॲप उघडल्यानंतर सर्वात खाली मेनू दिसतील त्यातील पहिला मेनू Narishakti Doot वर क्लिक करा.

Step – 4: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर क्लिक करा

Step – 5 : फॉर्म उघडल्यावर संपूर्ण माहिती भरून घ्या

Step – 6 : माहिती भरण्याची प्रक्रिया : स्टेप बाय स्टेप सर्व माहिती भरून घ्या, जन्माचे ठिकाण, जिल्हा, गाव/ शहर ग्रामपंचायत,नगरपालिका/ महानगरपालिका ही माहिती व्यवस्थित भरा.

Step – 7 :आवश्यक कागदपत्रे जोडणे : हमीपत्र अपलोड करा. बँक पासबुक अपलोड करा. सध्याचा फोटो अपलोड करा.

Step – 8 : फॉर्म सबमिट करणे सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केल्यानंतर माहिती जतन करा वर क्लिक करा व थोडा वेळ थांबा तुम्हाला टाकलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल चार अंकी ओटीपी टाका, फॉर्म सबमिट करा.

Step – 9 : अर्जाची स्थिती तपासणी अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची स्थिती जाणण्यासाठी केलेले अर्ज या टॅब वर क्लिक करा तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती जाणता येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज स्कीम पेंडिंग मध्ये दिसेल.

Majhi ladki bahin yojana

Leave a Comment