भारताचे भविष्य बदलणाऱ्या 10 क्रांतिकारी योजना : Revolutionary Schemes Transforming India’s Future
भारत सरकारने सामाजिक आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी तसेच आपल्या नागरिकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी काही नाविन्यपूर्ण सरकारी योजना चालू केल्या. या सरकारी योजनांच्या मालिकेद्वारे भारताने महत्त्वपूर्ण प्रगती तसेच परिवर्तन पाहिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखालील भारत सरकारने सुरू केलेल्या या योजना शाश्वत विकास आर्थिक वाढ आणि सर्वसमावेशकता ह्या महत्त्वाच्या केंद्रबिंदूवर विचार करून बनवल्या. भारताला सार्वभौम राष्ट्र बनवणे तसेच आर्थिक दृष्ट्या समृद्ध करणे, नवयुवकांना व्यवसायाची संधी प्राप्त करून देणे, तसेच उद्योजकांना आर्थिक सहाय्य करणे. ह्या पद्धतीने सरकार सर्वांना आपल्या योजनांच्याद्वारे मदत करत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वाढ आरोग्यसेवा गृहनिर्माण आणि शिक्षण अशा विविध विकासाच्या पैलूंसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या त्यातील काही महत्त्वाच्या योजना खालील प्रमाणे आहेत….
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 :लाडकी बहीन योजना: वादाच्या भोवर्यात अडकलेली सरकारी योजना
भारताचे भविष्य बदलणाऱ्या 10 क्रांतिकारी योजना : Revolutionary Schemes Transforming India’s Future खालील प्रमाणे…
Economic and Financial Inclusion : आर्थिक आणि आर्थिक समावेश
१)Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY) : प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY)
ह्या योजनेतून सर्वांना बँकेमध्ये खाते ओपन करता यावे. सर्वांची बँकेची संलग्नता वाढवून आर्थिक व्यवहारांमध्ये गुणवत्ता प्राप्त व्हावी हा मुख्य ऊद्देश समोर ठेऊन भारत सरकारने ही योजना अमलात आणली. तसेच शून्य बॅलन्स खाते उघडून, रुपे डेबिट कार्ड आणि अपघात विमा देखील बहाल केला .
२)Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) : प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)
या योजनेच्या माध्यमातून शिशु, किशोर आणि तरुण वर्गाला नवीन ऊद्योग करण्यास प्रोत्साहन देऊन. त्यामध्ये त्यांना तारण मुक्त कर्ज अर्थसहाय्य देणे अशी ह्या योजनेची उद्दिष्टे आहेत.
३)Atmanirbhar Bharat Abhiyan : आत्मनिर्भर भारत अभियान
उद्दिष्ट: स्थानिक उत्पादन, उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देऊन भारताला स्वावलंबी बनवणे.
Housing and Infrastructure : गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा
४)Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) : प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)
ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट: 2022 पर्यंत क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (CLSS) अंतर्गत अनुदानित गृहकर्ज ऊपलब्ध करूण सर्वांसाठी घरे निर्माण करणे.
५)Smart Cities Mission :स्मार्ट सिटी मिशन
ह्या योजनेचे मुख्य ऊद्दिष्ट प्रगत पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि प्रशासनासह शहरी भागांचा स्मार्ट शहरांमध्ये विकास करणे हे आहे.
Health and Well-being :आरोग्य आणि कल्याण
६) Ayushman Bharat – Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PMJAY) : आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY)
या योजनेच्या माध्यमातून युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज प्रति कुटुंब दरवर्षी पाच लाखापर्यंत मोफत उपचार प्रदान केले जातात.
७)Swachh Bharat Abhiyan : स्वच्छ भारत अभियान
या योजनेचे ऊद्दिष्ट घनकचरा व्यवस्थापनाची सुधारणा करून प्रतिक कुटुंब शौचालय बनवून स्वच्छ भारत विकसित करणे हा आहे.
८) Poshan Abhiyaan : पोशन अभियान
पोषण अभियान अंतर्गत मुले, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांचे पोषण सुधारणे हा मुख्य हेतू आहे.
कृषी आणि ग्रामीण विकास
९)Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) : प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)
प्रधानमंत्री पीक विमा (PMFBY) योजनेचा ऊद्देश देशातील शेतकर्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांविरुद्ध पीक विमा देणे आहे.
१०) Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana (PMKSY) : प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY)
ह्या योजनेच्या माध्यमातुन शेतकर्यांची सिंचन सुविधा सुधारणे आणि शेतीमध्ये पाणी वापर कार्यक्षमता सुनिश्चित करणे हा आहे.
११) PM-Kisan Samman Nidhi (PM-KISAN) : PM-किसान सन्मान निधी (PM-KISAN)
PM-Kisan Samman Nidhi (PM-KISAN) scheme मधून शेतकर्यांना वार्षिक ६,०००/- थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करून त्यांना उत्पन्न समर्थन प्रदान करणे आहे.
Skill Development and Employment : कौशल्य विकास आणि रोजगार
१२) Skill India Mission : स्किल इंडिया मिशन
ह्या योजनेतुन तरुणांची रोजगारक्षमता वाढवणे व उद्योग-संबंधित कौशल्ये प्रशिक्षित करणे हा आहे.
१३) Make in India : मेक इन इंडिया
भारतातील उत्पादनाला चालना देणे आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे हा ह्या योजनेचा मुख्य हेतु आहे.
१४) Stand Up India : स्टँड अप इंडिया
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांमधील उद्योजकतेला पाठिंबा.
Education and Technology : शिक्षण आणि तंत्रज्ञान
१५) Digital India Mission : डिजिटल इंडिया मिशन
भारताला डिजिटली सशक्त समाज आणि ज्ञान अर्थव्यवस्थेत रूपांतरित करणे हा Digital India Mission scheme चा मुख्य ऊद्देश आहे.
१६) Samagra Shiksha Abhiyan : समग्र शिक्षा अभियान
सर्व मुलांसाठी गुणवत्ता आणि प्रवेश यावर लक्ष केंद्रित करून शालेय शिक्षण सुधारणे.
ह्या सर्व योजनांच्या माध्यमातुन भारत देशाला एक विकसीत देश बनवने तसेच जागतीक पटलावरती एक चांगले स्थान निर्माण करणे हा आहे. तसेच देशातील नवयुवकांना, ऊद्योगांना विकसीत करूण एक आत्मनिरभर भारत बनवणे हा आहे.
